ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव येथे मराठी राजभाषा दिन साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव येथे मराठी राजभाषा दिन साजरा.

प्रकाशन: 04 Mar 2022 03:38 PM
वाचन संख्या 57

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा दिना निमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले होते. ज्यांच्या जन्म दिना निमित्त हा मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो त्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या पुस्तकाचे मुलांकडून वाचन करण्यात आले. प्रदर्शनामध्ये कुसुमाग्रजांच्या साहित्या बरोबरच इतर सर्व प्रकारच्या मूल्यवान ग्रंथांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या पुस्तक प्रदर्शनाचा लाभ अनेक प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसह युवक तसेच ग्रामस्थानी घेतला.
या प्रसंगी ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री.उदय परब, कार्यवाह श्री.प्रविण पारकर, उपाध्यक्ष श्री.मधुसुदन परुळेकर,खजिनदार श्री.गजानन सुर्वे, सदस्य श्री.पांडुरंग राणे, श्री.प्रविण परब, ग्रंथपाल सौ.साक्षी मेस्त्री, कर्मचारी श्री.महेश साळकर, आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स