ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचे तहसीलदारांना निवेदन.

पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचे तहसीलदारांना निवेदन.

प्रकाशन: 03 Mar 2022 08:22 PM
वाचन संख्या 224

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील पळसंब गावात, तलाठी सजा स्वतंत्र आहे तरिही या गावात कायमस्वरुपी तलाठी नाही ही सद्यस्थिती आहे.गावाला स्वतंत्र तलाठी नसल्याने व सामाईक तलाठ्यांना इतर गावेही असल्याने पळसंब ग्रामस्थांना आवश्यक सरकारी कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत. पळसंब गावाला कायमस्वरुपी तलाठी मंजूर करुन गावातील लोकांची गैरसोय त्वरीत टाळली जावी यासाठी पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी मालवणच्या तहसीलदारांना ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले आहे.या निवेदनाची दखल घेऊन पळसंब ग्रामस्थांच्या अडचणींना समजून त्यानुसार तत्काळ तलाठी नेमणूकीची कार्यवाही व्हावी अशी मागणी पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी व्यक्त केली आहे

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स