ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
विनायक राऊत यांनी मित्र नितेश राणेंकडून मातोश्रीवर होणारी टीका थांबवावी-परशुराम उपरकर..

विनायक राऊत यांनी मित्र नितेश राणेंकडून मातोश्रीवर होणारी टीका थांबवावी-परशुराम उपरकर..

प्रकाशन: 16 Aug 2021 04:33 PM
वाचन संख्या 75

कणकवली / उमेश परब :- खासदार विनायक राऊत आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात मैत्री जाहीर झाली आहे.नेहमी भाजपा आमदार नितेश राणे थेट मातोश्रीवर टीका करतात, याचे नेमके गौडगगंबाल काय आहे ? आम्ही नारायण राणेंना कट्टर शिवसैनिक २००५ सालात लढलो,तेव्हा अनेक शिवसैनिकांना मोडले,तोडफोड केली.त्यामुळे राऊत यांनी नितेश राणे यांची मैत्री बद्दल चर्चा झाली.त्यामुळे विनायक राऊत यांनी मित्र नितेश राणेंकडून मातोश्रीवर होणारी टीका थांबवावी,असा उपरोधक टोला मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला.
कणकवली मनसे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना पेंग्विन म्हणत हिणवतानाच थेट मातोश्री भवन फोडण्याची भाषा नितेश राणेंनी केली. खासदार राऊत आणि आमदार नितेश यांच्या मैत्रीची बातमी जेव्हा राज्यभर पसरली, तेव्हा जुन्या शिवसैनिकांना आश्चर्य वाटले. २००५ मध्ये राणे कुटुंबियांच्या विरोधात जाऊन आम्ही शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केला.
२००५ च्या पोटनिवडणुकीत राणेंची शिवसेनेवर असलेली दहशत आणि बेपत्ता रमेश गोवेकर प्रकरण साऱ्या महाराष्ट्राने पाहिले. खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी राणेंवर आसूड ओढले. मात्र वेंगुर्लेतील कार्यक्रमात खासदार राऊत यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा भाजपा आमदार नितेश राणेंशी आपली मैत्री असल्याचे जगजाहीर केले. त्यानंतर आमदार नितेश राणेंनी पालकमंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण सामंत यांना सचिन वाझे म्हणत हल्लाबोल करतानाच खासदार विनायक राऊत यांची पाठराखण केली. त्यानंतर जणू शिवसेनेच्या नेत्यावर टीका केल्यासारखी सिंधुदुर्गातील शिवसेनेचे उपरे नेते किरण सामंताची बाजू घेऊन मीडियाला सामोरे जाताहेत. राणेंशी टक्कर देणारा नेता म्हणून स्वतःबद्दल बोलणारे खासदार विनायक राऊत हे खारेपाटणच्या सीमेवर गाडीवरील भगवा झेंडा काढून सिंधुदुर्गात येत असत हा इतिहास आहे. आमदार नितेश राणेंना स्वतःचे दोस्त म्हणवणारे खासदार विनायक राऊत नितेश राणेंकडून मातोश्री वर आणि मुख्यमंत्री ठाकरेंवर होणारी कडवट टीका थांबवतील काय ? हा सवाल सिंधुदुर्गातील कट्टर शिवसैनिकांना पडला आहे, असा उपरोधिक टोला उपरकर यांनी लगावला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स