ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चिंदर ग्रामपंचायत तर्फे गुणवंताचा गौरव व कोरोना योध्यांचा सत्कार

चिंदर ग्रामपंचायत तर्फे गुणवंताचा गौरव व कोरोना योध्यांचा सत्कार

प्रकाशन: 16 Aug 2021 04:42 PM
वाचन संख्या 95

चिंदर | विवेक परब : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन आज चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने चिंदर ग्रामपंचायत मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव व कोरोना काळात काम करणाऱ्या कोरोना योध्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत सरपंच सौ. राजश्री कोदे यांनी केले, डाँ. शामराव जाधव, मंडल अधिकारी श्री.पाटील, पंचायत समिती सदस्य अशोक बागवे, भाजप तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर, सरपंच संघटना अध्यक्ष हडी सरपंच महेश मांजरेकर, कृषी अधिकारी खराडे, मनोहर(नाना) घाडी यांनी यावेळी आपले विचार मांडले. आपण प्रभात फेरी काढून लोकांच्या मनात देशभक्ती जागृत करत असू असे उद्गार मनोहर घाडी यांनी काढले तर मुलांनी आय. पी.एस् सुब्रमण्यम केळकर यांचा आदर्श ठेवावा असे विचार धोंडी चिंदरकर यांनी मांडले.
   त्यानंतर अनुक्रमे  डि.बी.एस परिक्षा उत्तीर्ण, दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थी  तसेच विशेष  सत्कार आय.पी.एस् उत्तीर्ण सुभ्रमन्य केळकर, सिविल इंजिनियर उत्तीर्ण प्रथमेश तावडे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम, ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव, उद्योजक संतोष कोदे व प्रकाश मेस्री,आदर्श अंगणवाडी सेविका मनवा चिंदरकर,यांचा  करण्यात आला..
        कोविड सेंन्टरला मदत करणाऱ्या शशिकांत गोलतकर,पालकरवाडी विकास मंडळ मुंबई, संदिप पारकर, गणेश गोगटे, अशोक रावराणे, विजय केनवडेकर, संतोष घाडी, मंगेश गांवकर, विजय पाताडे यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ  देऊन सत्कार करण्यात आला.
      तसेच कोरोना योध्दा अमित घागरे व भाई तावडे, आरोग्य सेवक, सेविका, तलाठी, आशा स्वयंसेविका,शिक्षक,अंगणवाडी सेविका,मदतनिस, वायरमन, ग्रामपंचायत कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, संतोष गांवकर, हिमाली अमरे,ब्रांजेल फर्नांडीस, मधुकर पाताडे,देवेद्र हडकर, ग्रामपंचायत सदस्य केदार परुळेकर, स्वरा पालकर, दुर्वा पडवळ, शशिकांत नाटेकर,जान्हवी घाडी,सानिका चिंदरकर, रिया घागरे, निलेश रेवडेकर तसेच गोपाळ लब्दे, शेखर पालकर, अजित पाडावे, दत्ता वराडकर इ. मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 309

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स