ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा पूरग्रस्तांना आधार ग्रुपने दिला मदतीतून आधार…!

बांदा पूरग्रस्तांना आधार ग्रुपने दिला मदतीतून आधार…!

प्रकाशन: 01 Aug 2021 08:57 PM
वाचन संख्या 80

पूरग्रस्तांनी गृपच्या सदस्यांचे मानलेआभार…!

कणकवली | उमेश परब : बांदा येथे झालेल्या अतिवृष्टीचा फटका साईमंदिर येथील राकेश केसरकर यांच्यासह २० कुटुंबीयांना बसला होता. या पूरग्रस्तांना आधार ग्रुप टेंबवाडीतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन मदतीचा आधार दिला.

यावेळी वैभव मालंडकर, नयन यादव, बाळकृष्ण यादव, दिनेश पेडणेकर, विशाल पेडणेकर, किशोर घुरसाळे, महेंद्र सावंत, विक्रांत सावंत, आतिश कांदळकर, सोमनाथ पाटगावकर, प्रथमेश परब, तुषार गोवणकर, साईनाथ वालावकर, सुहास सूर्यवंशी, महादेव चव्हाण, बबन गोळवणकर, साईप्रसाद गोळवणकर आदी उपस्थित होते. जीवनावश्यक वस्तूंमध्ये तांदूळ, गहू, कांदे-बटाटे, मसाले, तेल, भांडी धुण्याचा साबण, टूथपेस्ट वगैरे वस्तूंचा समावेश होता. ही मदत केल्याबद्दल साईभक्त राकेश केसरकर यांनी आधार गृपच्या सदस्यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला. समाजाचे आम्ही देणे लागतो या भावनेतून आम्ही ही पूरग्रस्तांना मदत केली आहे. ही समाजसेवा करण्याचे हे निमित्त आहे. कर्ता करविता हा परमेश्‍वर असतो. या समाजसेवेची संधी आम्हाला लाभली. यासाठी परमेश्‍वराचे मनापासून प्रार्थना अशी प्रतिक्रिया आधार ग्रुप चे अध्यक्ष प्रथमेश परब यांनी व्यक्त केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स