बांद्यातील 'नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदांडा' यांच्या वतीने स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम संपन्न.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बांद्यातील ‘नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदांडाच्या’ सौजन्याने बांदा येथील मठातील श्री सदस्यांकडून नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी वर्षानिमित्त येथील स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
दरवर्षी या दास सदस्य व संबंधीत मंडळींकडून ही मोहीम राबविण्यात येते. यावर्षी जन्मशताब्दीवर्षा निमित्ताने मोठ्या प्रमाणात साफसफाई मोहीम राबविण्यात आली. येथील स्मशानभूमीचा परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला.
यावेळी सरपंच अक्रम खान, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत यांनी देखील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेमुळे सामाजीक समाधान व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)