डिंगणे येथील किशोर सावंत मित्रमंडळातर्फे निमंत्रित संघांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिंगणे येथील किशोर सावंत मित्रमंडळाच्या वतीने भाजप पुरस्कृत ५ व ६ मार्च रोजी सिंधुदुर्ग व गोव्यातील नामांकित निमंत्रित संघांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा डिंगणे-पाशिवाडी येथील प्रभावती हॉल नजीकच्या मैदानावर होणार आहेत.
या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग व गोवा फेडरेशनच्या माध्यमातून एकूण १६ निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. ५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी सभापती प्रमोद कामत, सभापती निकिता सावंत, उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, माजी सरपंच मंदार कल्याणकर, डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर, उपसरपंच जयेश सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कबड्डी प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष महादेव सावंत, नितीन सावंत व प्रदीप सावंत यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)