ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते.त्यामुळे खिलाडूवृत्ती वाढते : विरेन गायकवाड
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते.त्यामुळे खिलाडूवृत्ती वाढते : विरेन गायकवाड

प्रकाशन: 02 Mar 2022 12:34 PM
वाचन संख्या 257

शिरवल क्रिकेट लीग स्पर्धेत रवळनाथ पडवे संघ विजेता तर विनसम वागदे उपविजेता

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरवल गांवासारख्या ग्रामीण भागात स्वर्गीय शेखर शिरसाट मित्र मंडळाने “एक गाव ,एक संघ, क्रिकेट लिग स्पर्धेचे” आयोजन करून खेळाडूना क्रिकेटचे एक चांगले व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे.मंडळाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि स्तुत्य आहे.क्रिकेट खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते.त्यामुळे खिलाडूवृत्ती वाढते.या स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात निश्चितच अनेक चांगले गुणवंत खेळाडू निर्माण होतील.असे प्रतिपादन टॅलेक्स अकॅडमी, कणकवलीचे व्यवस्थापक विरेन गायकवाड यांनी केले.ते शिरवल रतांबेवाडी येथे क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी सैनिक आनंद पेडणेकर, उद्योजक शरद शिरसाट, कृष्णा कुडतरकर,दत्तात्रय प्रभू पाटकर ,सुरेश कोदे, प्रमोद नानचे, दयानंद कोदे,अनिल कुडतरकर ,प्रविण कोरगावकर, प्रमोद सावंत,चंद्रकांत कुडतरकर , प्रकाश मसुरकर,प्रशांत कुडतरकर ,महेश कुडतरकर, सूनिल कुडतरकर , मोहन कुडतरकर, अनिल शिरसाट,गुरुप्रसाद वंजारे, राजेश शिरवलकर ,आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की,खेळ म्हटला, की जय-पराजय, यश-अपयश आलेच. मग यशाने हुरळून जाऊ नका नि पराजयाने खचून जाऊ नका, खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते.त्यामुळे खिलाडूवृत्ती वाढते. असेही ते म्हणाले. स्व. स्वर्गीय शेखर शिरसाट हे व्यक्तिमत्त्व परोपकारी वृत्तीचे व्यक्तीमत्व होते.कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक , राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे होते.आणि हाच त्यांचा
वारसा अशा‌ विविध उपक्रमातून
स्व.शेखर शिरसाट मित्र मंडळ जोपासत आहेत.मंडळाचे हे उपक्रम निश्चितच स्तुत्य आणि कौतुकास्पद आहेत असे गौरवोद्गार गायकवाड यांनी काढले.

यावेळी स्पर्धेत प्रथम विजेता ठरलेल्या रवळनाथ पडवे संघाला रोख रक्कम दहा हजार एक रुपये आणि आकर्षक ‌चषक देऊन आनंद पेडणेकर आणि शरद शिरसाट यांच्या हस्ते गौरविण्यात आले. उपविजेता – विनसम वागदे – संघाला ७००१ रुपये आणि आकर्षक चषक दत्तात्रय प्रभुपाटकर आणि दयानंद कोदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तृतीय क्रमांक – सनराईज हळवल संघाला ,विरेन गायकवाड यांच्या हस्ते आकर्षक चषक मालिकावीर – श्रीधर सावंत (पडवे) याला,सुरेश कोदे
उत्कृष्ट फलंदाज – अमित पडवेकर (पडवे) याला प्रमोद नानचे
उत्कृष्ट गोलंदाज – गिरीश परब (वागदे)याला अनिल कुडतरकर
उगवता खेळाडू – सुरज रावत (पडवे) याला प्रमोद सावंत सहभागी संघ – सन्मानचिन्ह -प्रशांत कुडतरकर यांच्या सौजन्याने तर,विरेन गायकवाड यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी सैनिक आनंद पेडणेकर म्हणाले कि,. क्रिकेट खेळामुळे चपळता, काटकपणा व शिस्तप्रियता या गुणांचा विकास होतो. या खेळात फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्व बाबतीत आपले नैपुण्य दाखवता येते तसेच खेळामुळे मनाची एकाग्रता वाढते. खिलाडूवृत्ती वाढते.असे पेडणेकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि आभार सुनिल कुडतरकर यांनी मानले.क्रिकेट स्पर्धेचे धावते समालोचन समालोचक विलास गोलतकर यांनी केले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्व.शेखर शिरसाट मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली.

फोटो: स्व.शेखर शिरसाट मित्र मंडळ शिरवल आयोजित क्रिकेट लीग स्पर्धेत प्रथम विजेता ठरलेल्या रवळनाथ पडवे संघाला गौरविताना शरद शिरसाट आणि आनंद पेडणेकर,सोबत मंडळाचे पदाधिकारी आदी.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स