ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
सिंधुदुर्गातील महिला क्रिकेटचा थरार...! (विशेष)
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधुदुर्गातील महिला क्रिकेटचा थरार...! (विशेष)

प्रकाशन: 02 Mar 2022 12:21 PM
वाचन संख्या 549

कुणकेश्वर संघाला विजेते पद..!

वायंगणीची अक्षता सावंत ठरली मालिकावीर..!

चिंदर / विवेक परब (विशेष) : क्रिकेट या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील मर्यादीत षटकांच्या सामन्यातील पहिले द्विशतक एका महिलेने ठोकलं होतं…ती होती ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क.
त्यानंतर तेंडुलकर,रोहीत शर्मा,गप्टील अशा पुरुषांना तसे करायचे प्रोत्साहन मिळाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही तसे घडायच्या शक्यतेचा सूर्य आता उगवलेला आहे .

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील मिठबांव येथील सिध्दार्थ स्पोर्टस् क्लब कबिर नगर येथील मैदानावर आयोजित महिला क्रिकेटच्या रणसंग्रामात मालवण तालुक्यातील वायंगणी येथील रवळनाथ क्रिकेट संघ उपविजेता ठरला.
अटीतटीच्या लढतीत कुणकेश्वर संघाला विजेते पद मिळाले. मालिकावीर म्हणून वायंगणीच्या अक्षता सावंत यांना गौरविण्यात आले.
अशा स्पर्धेमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट व महिला क्रिकेट अशा दोन स्तरांवरील प्रगतीची खेळपट्टी आणखीन मजबूत होत आहे. 
उल्लेखनीय बाब म्हणजे या टिम मध्ये काही खेळाडू विवाहीत आहेत.

स्पर्धेत कर्णधार म्हणून अक्षता सावंत, समृद्धी आसोलकर, तन्वी मालवणकर, अंकिता सावंत, नम्रता साळकर, सौम्या माळकर, मनिषा माळकर, तन्वी सावंत, मनस्वी नाईक, लावण्या सावंत यांचा समावेश होता.

या महिला खेळाडूंना ज्ञानदीप विद्यामंदिर चे शिक्षकवृंद यांनी अशा स्पर्धा खेळण्यासाठी उद्युक्त केल. दिशा  दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच ॲड. समृद्धी आसोलकर, सचिन रेडकर, सिमा सावंत, प्रफुल्ल माळकर, पप्पी मामा, सुशांत आसोलकर, अभी सावंत, सागर राणे, प्रथमेश सावंत, सर्वेश सावंत व श्री स्वामी समर्थ (स्वामी रवळनाथ) पुरुष संघाचे पण या खेळाडूंना मोलाचे सहकार्य लाभत आहे.
या यशाबद्दल या स्पर्धेतील सर्व महिलांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स