नांदगाव युवासेना शहर प्रमुख पदी इमाम ऊर्फ राजा नावळेकर यांची निवड
चिंदर/विवेक परब : कणकवली तालुक्यातील नांदगाव युवासेना शहरप्रमुख पदी इमाम उर्फ राजा नावळेकर यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी नुकतेच दिले आहे.
यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे अल्पसंख्याक तालुकाप्रमुख निसार शेख ,शाखा प्रमुख राजा म्हसकर , तात्या निकम ,ललित घाडीगावकर, प्रफुल्ल तोरसकर आदी उपस्थित होते.युवासेना नांदगाव शहर प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल राजा नावळेकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)