भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचा या तारीखला विधान भवनावर मोर्चा
🔸 जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी मोर्चासाठी उपस्थित राहाणार–जिल्हाध्यक्ष–उमेश सावंत
चिंदर/विवेक परब : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांचा शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी (विद्युत बिल, ऊस, एफ आर सी व स्थानिक) सोडवण्यासाठी व राज्य सरकारला जाग आणण्यासाठी 4 मार्चला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांच्या नेतृत्वाखाली विधान भवनावर मोर्चा जाणार आहे.
या मोर्चासाठी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस उपस्थित राहाणार आहे. मोर्चासाठी बहुसंख्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी मुंबईला जाणार असल्याचे किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)