जलतरणपटू गुरुप्रसाद मोरेचा सिंधुदुर्ग जलतरण संघटनेकडून सन्मान!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : कोल्हापूर शाहूपुरी येथील १४ वर्षीय जलतरणपटू गुरुप्रसाद विनोद मोरे याने किल्ले सिंधुदुर्ग पासून किल्ले विजयदुर्ग पर्यंतचा अरबी समुद्रातील सुमारे ८० सागरी मैलांचा जलप्रवास सुमारे १९ तास २३ मिनिटांत पूर्ण करून एक विक्रम नोंदविला.तत्पूर्वी मालवण जेटी येथे सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने गुरुप्रसाद मोरे याचा सत्कार करत त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. सिंधुदुर्ग जलतरण संघटना अध्यक्ष उद्योजक दीपक परब, देवगड सभापती रवी पाळेकर, राज्य सचिव राजू पालकर, माजी जी प अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजप नेते विजय केनवडेकर आदी उपस्थित होते. कोल्हापूर येथील ‘जीम्स स्विमिंग अॅकॅडमी’चे प्रशिक्षक अजय पाठक यांच्या माहितीनुसार, गुरुप्रसाद मागील तीन वर्षांपासून सराव करीत होता. छोट्या-छोट्या सरावानंतर त्याने सागरी अंतर पूर्ण करण्याचा मनोदय केला. राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने ही मोहीम आखण्यात आली. गुरुप्रसादचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्याचे मनोबल उंचावण्यासाठी साऱ्यांनी प्रयत्न केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)