ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वडाचापाट हायस्कुल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

वडाचापाट हायस्कुल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

प्रकाशन: 01 Mar 2022 05:52 PM
वाचन संख्या 110

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. भारतातील महान भौतिकशास्त्रज्ञांपैकी एक सर सी. व्ही. रमण यांनी लावलेल्या “रामन इफेक्ट” या शोधाच्या स्मरणार्थ जगभर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो . कार्यक्रमाची सुरुवात डोळे उघडून बघा गड्यानो झापड लावू नका या विज्ञान गीताने झाली .प्रश्न किती गहन असो , उत्तर देते विज्ञान तर्काच्या सुगंधाने अत्तर देते विज्ञान .अंधश्रध्देच्या पलीकडचे पाहू शकते विज्ञान .तुमच्या माझ्या श्रध्देसोबत राहू शकते विज्ञान या कवितेने वातावरण विज्ञानमय झाले.

विद्यार्थ्यांची विज्ञान विषयावर विविध भाषणे झाली . यामध्ये कु.अवधूत आचरेकर , कु.राजकुमार दुखंडे , कु.संघमित्रा पवार , कु.रिया पेंडूरकर व सोहम चिरमुले यानी भाग घेतला. प्रशालेतून इ.८ वी,९ वी व १० वी तील विद्यार्थ्यांनी एकूण ३० विज्ञान प्रतिकृती तयार केल्या.यामध्ये कंपनावर चालणारा कोळी , राखेपासून वीज निर्मिती ,साधे सायफन यंत्र , एअर कूलर ,वॉटर हिटर ,पाण्याचे शुध्दीकरण , सिगारेट चे दुष्परिणाम ,फुप्फुस कार्य या सर्व प्रतिकृतींनी सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व विज्ञान प्रतिकृतीसाठी मार्गदर्शन प्रशालेचे विज्ञान शिक्षक प्रसाद कुबल यांनी केले.या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पाटील जे. एन. ,सौ सनये प्रीती ,सौ वेदिका दळवी व कुमारी प्रतिभा केळुसकर या उपस्थित होत्या .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स