ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
विलवडे परिसरातील नागरीकांनी आरोग्य शिबिरास उत्स्फुर्तपणे प्रतिसाद.

विलवडे परिसरातील नागरीकांनी आरोग्य शिबिरास उत्स्फुर्तपणे प्रतिसाद.

प्रकाशन: 27 Feb 2022 11:12 PM
वाचन संख्या 105

बांदा | राकेश परब : महाराष्ट्र नवनिर्माण सेना माध्यमातून ‘शिव आरोग्य सप्ताह’ निमित्त विलवडे या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर घेऊन रुग्णांची तपासणी करण्यात आली.
विलवडे परिसरातील नागरिकांनी आरोग्य शिबिरास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला. माजी आमदार तथा मनसेचे नेते परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या तेजस्विनी हेल्थकेअरचे डाॅक्टर व त्यांची टीम,मनसेच्या कार्यकर्त्याचे विलवडे गावांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
         
जिल्हा परिषद विलवडे शाळा नं. १ येथे आयोजित करण्यात आलेल्या संपूर्ण शारीरिक तपासणी अ‍ॅक्युप्रेशर व फिजिओ थेरपी तपासणी करण्यात आली.

उद्घाटन मनसेचे जिल्हा परिवहन कार्याध्यक्ष संतोष भैरवकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विलवडे सरपंच दिनेश दळवी,मनसेचे सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, विलवडे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत, माजी उपसभापती विनायक दळवी,कृष्णा सावंत,माजी सरपंच बाळकृष्ण दळवी,विलवडे वाचनालयाचे अध्यक्ष राजाराम दळवी,विलवडे पतसंस्थेचे व्यवस्थापक सोनू दळवी,परेश धरणे,संतोष दळवी,प्रमोद दळवी, गोविंद तांबे,डॉ.किरण साळगावकर,स्नेहा जाधव,अक्षय नेरूरकर आदी उपस्थित होते.      सूत्रसंचालन व आभार माजी उपसरपंच प्रकाश दळवी यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स