ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
श्री बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्री सोहळा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

श्री बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्री सोहळा.

प्रकाशन: 27 Feb 2022 11:38 PM
वाचन संख्या 42

आजपासून (सोमवारपासून )चार दिवस विविध कार्यक्रम.

बांदा |‍ राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथिल प्रसिद्ध व जागृत अशा स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त  चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. महाशिवरात्री मंगऴवार दि.१ मार्च रोजी असून सोमवारी रात्री पालखी सोहळ्याने हा उत्सव आरंभ होईल.
यानिमित्त पुढीलप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत. सोमवार दि २८फेब्रुवारी  रोजी रात्रो ९ ते १२ श्री बांदेश्वर मंदिराभोवती श्रींची सवाद्य पालखी प्रदक्षिणा होणार आहे.मंगऴवार दि.१ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सुर्योदयापासुन ते  दुसऱ्या दिवशी सुर्योदयापर्यंत  स्वयंभू लिंगावर अष्टौप्रहर रुद्रावर्तनद्वारा अभिषेक होईल. सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत श्री शिवलिलामृत ग्रंथ पारायण होईल.सायं ३.३० ते ८.३० या वेळेत विविध भजनी मंडळांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. रात्रौ ९ ते १२ श्रींची मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा होईल.
बुधवार २ मार्च रोजी सायं ५ वाजता श्रींची पालखी मिरवणुक वाजत गाजत श्री पाटेश्वर मंदिराकडे प्रस्थान करील . श्री पाटेश्वर मंदिरातील भजनानंतर पालखीचे पारंपारिक राजमार्गाने मंदिरापाशी आगमन होईल. त्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणाकरून व भजन करुन पालखीचे पुन्हा मंदिरात आगमन होईल. यावेळी महाआरती करण्यात येईल. रात्रौ १० वाजता   तेंडोलकर दशावतार नाट्य मंडळ ,झारापयांचा “मुंडासुर मर्दिनी” हा दणदणीत दशावतार नाट्यप्रयोग  सादर होईल. 

 गुरुवार  दि. ३ मार्च रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत समाराधना होऊन या सोहळ्याची सांगता होईल.  भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री  देव बांदेश्वर भुमिका देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स