गोंधळ....श्री देवी भराडी मातेचा..!
सिंधुविहान…!
रचनाकार | सौ.सुप्रिया प्रभूमिराशी. (कणकवली)
भरडावरची आई भराडी
गोंधळास झणी ये,
गोंधळास झणी ये,
आई भराडी गोंधळास झणी ये!…||धृ.||
भरडा वरती आई प्रकटली
किती सांगु तिची महती?
पावन झाली आंगणेवाडी धरती,
लेकी- सुना ओटी भरायला येती..!
शक्तीशाली दैवत
आईचे स्मरण सतत मनात,
आमुच्या दुःखावरी मात
लेकरू मानुनी करी सतत..!
भक्तांना इच्छीत फळ देई
आई देवी भराडी,
सोसावी कळ थोडी
भरुनी देईल सौभाग्य परडी….!
देवीचा गोंधळ घालाया जमली
लेकी- सुना मंडळी,
तुझ्या चरणी गं मागणी
लेकरू सुखात तू सांभाळी…!
भरडा वरची आई भराडी
गोंधळास झणी ये,
गोंधळास झणी ये,
आई भराडी गोंधळास झणी ये!…||धृ.||
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)