ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
"तसं तर आई देवी भराडीकडे काही मागत नाही पण .......": विनोद तावडे.

"तसं तर आई देवी भराडीकडे काही मागत नाही पण .......": विनोद तावडे.

प्रकाशन: 24 Feb 2022 02:21 PM
वाचन संख्या 176

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : गेली दोन वर्ष सामान्य भाविकांना आंगणेवाडी यात्रेत सहभागी होता आलं नव्हतं. यंदा कोरोनाचे नियम व अटी पाळून या यात्रेला व भराडी देवीच्या दर्शनाला परवानगी मिळाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या आंगणेवाडी यात्रेला आज पहाटेपासून सुरुवात झाली.
आज सकाळी अनेक भाविकांसोबतच राजकीय नेत्यांनीही तिथे उपस्थिती लावून दर्शन घेतले.
भाजपाचे वरिष्ठ नेते आशीष शेलार,माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सिंधुदुर्ग जिल्हा बॅन्केचे अध्यक्ष अतुल काळसेकर यांनी आंगणेवाडी यात्रेला भेट देऊन श्री देवी भराडीचे दर्शन घेतले.

यावेळी सोबत असलेल्या स्थानिक भाजपा नेते व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आशिष शेलार आणि विनोद तावडे यांनी माध्यमांशीही संवाद साधताना राज्य सरकार आणि संबंधीत व्यवस्थांवर देखील टीका केलेली आहे.


यावेळी बोलताना विनोद तावडे म्हणाले की तसं तर आपण आई देवी भराडी मातेकडे काहीही मागत नाही परंतु यंदा एस.टी.कर्मचार्यांच्या मागण्यांची राज्यसरकारमार्फत योग्य ती दखल घेतली जावी हीच मागणी देवीकडे आपण करतोय. एस.टी.कर्मचारी,इ.डी. चौकशी अशा मुद्द्यांवर कोणाचेही नांव न घेता केवळ सर्व काही न्यायाने व्हावे आणि भ्रष्टाचार उखडून फेकला जावा अशी मागणी आई भराडी देवीकडे केल्याचेही यावेळी आशिष शेलार यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स