ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सावंतवाडी अध्यक्षपदी सुनिल राऊळ तर सचिवपदी श्री. बाबली गवंडे ...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सावंतवाडी अध्यक्षपदी सुनिल राऊळ तर सचिवपदी श्री. बाबली गवंडे ...!

प्रकाशन: 24 Feb 2022 02:50 AM
वाचन संख्या 101

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : “सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग” च्या सावंतवाडी कार्यकारणीच्या सभेमध्ये अध्यक्षपदी श्री. सुनिल राऊळ यांची एकमताने निवड करण्यात आली, तर सचिवपदी श्री. बाबली गवंडे यांची फेरनिवड करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातली रक्तदान, अवयवदान, देहदान व रुग्णमित्र म्हणून करत असलेल्या कार्यात अग्रगण्य असणार्‍या “सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग” च्या सावंतवाडी शाखेची प्रकाश तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. यावेळी वार्षिक कार्याचा आढावा घेण्यात आला, नविन कार्यक्रमांचा कृती आराखडा तयार करण्यात आला, विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करुन मार्गदर्शन व काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
संस्थेच्या घटनेला व जिल्हा कार्यकारणीच्या सभेतील ठरावांस अनुसरुन सावंतवाडी तालुका कार्यकारणीची फेररचना करण्यात आली, नवीन कार्यकारणी करताना काही अंशतः बदल करण्यात आले.
सभेमध्ये अध्यक्ष पदी श्री सुनिल राऊळ यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी दीपक तारी व श्रीम. मंगल कामत यांची तर सचिव पदी बाबली गवंडे यांची फेरनिवड करण्यात आली.
सावंतवाडी दोडामार्ग तालुका विभागीय अध्यक्ष म्हणून श्री.संजय पिळणकर यांची निवड करण्यात आली. तालुका कार्यकारणीत नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले.
नवीन कार्यकारणी खालील प्रमाणे आहे. (अध्यक्ष) सुनिल राऊळ.
(उपाध्यक्ष) दीपक तारी व मंगल कामत.
(सचिव) बाबली गवंडे
(सहसचिव) अनिकेत सावंत
(खजिनदार) सिद्धार्थ पराडकर
(सहखजिनदार) सुप्रिया मोडक
सदस्य : संदीप चांदेकर
राकेश परब
निलेश मोरजकर
विद्याधर नाईक
हेमंत मराठे
तानाजी खोत
सौरभ पडते
रविंद्र तावडे
काका भिसे
जयगणेश गांवकर
याचबरोबर यावेळी संस्थेच्या जिल्हा सल्लागारपदी सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक श्री. दयानंदजी गवस यांची तर तालुका कार्यकारणी सल्लागारपदी श्री. सुधीरजी पराडकर व श्री. आनंदजी वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली, आणि त्याबद्दल या तिघांच्याही अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला, तर तालुका सचिव म्हणून चांगल्या पद्धतीने जबाबदारी सांभाळल्याबद्दल श्री. बाबली गवंडे यांच्याही अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
जिल्हा सल्लागार श्री.दयानंदजी गवस यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व मार्गदर्शन व महत्त्वाच्या सूचना केल्या, नूतन तालुका अध्यक्ष श्री.सुनिलजी राऊळ यांनी मनोगत व्यक्त केले, तर जिल्हाअध्यक्ष श्री. प्रकाशजी तेंडोलकर तसेच जिल्हासचिव श्री. किशोरजी नाचणोलकर यांनी सर्वांचे अभिनंदन करुन सदिच्छा दिल्या. सचिव श्री. बाबली गवंडे यांनी आभार मानले

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स