कोकण मराठी साहित्य परिषद मालवणतर्फे मराठी भाषा कौशल्य विकास शिबिर.
चिंदर | विवेक परब : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण आणि साने गुरुजी कथामाला शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी ओझर विद्या मंदिर, ओझर तालुका मालवण येथे माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी “मराठी भाषा कौशल्य विकास” शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात अनुक्रमे मराठी भाषेची उगमस्थाने आणि सृजनता (विठ्ठल कदम- सावंतवाडी ), मराठी भाषेचे सौंदर्य आणि व्याकरण (भरत गावडे- सावंतवाडी), मराठी भाषेच्या म्हणींचे कुळ आणि वाक्प्रचाराचे मूळ( सुरेश ठाकूर- मालवण) यांचे मार्गदर्शन होणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन श्री. सदानंद कांबळी हे श्रीम. सुमेधा कांबळे चारिटी ट्रस्टच्या वतीने करणार आहेत. ओझर विद्यामंदिर ओझर शाळेचे अमृत महोत्सवी वर्ष आणि बॅ. नाथ पै जन्मशताब्दी वर्ष या संगमावर या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक आणि सर्व सहकारी वर्ग यासाठी पूर्ण नियोजन करीत आहेत.
सदर कार्यक्रम २८ फेब्रुवारी सोमवार सकाळी १० ते १ या वेळेत होणार असून परिसरातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सुरेश शामराव ठाकूर अध्यक्ष को.म.सा.प. मालवण यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)