ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिरगांव रहिवाशांचा एक अनोखा आदर्श...

शिरगांव रहिवाशांचा एक अनोखा आदर्श...

प्रकाशन: 15 Aug 2021 06:32 PM
वाचन संख्या 94

शिरगांव | संतोष साळसकर : (विशेष वृत्त )सिंधुदुर्ग जिल्हातून आपत्ती निवारणासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, एन जी ओ , सरकारी यंत्रणा, प्रशासकीय प्रणाली, धर्मादाय मंडळे यांनी नेहमीच कंबर कसून मेहनत घेतलेली आहे.देवगड तालुक्यातील शिरगांव येथील रहिवाश्यांनी या अनेक संस्थांसोबतच सोबतच एक वेगळा आणि अनोखा आदर्श समाजासमोर ठेवलेला आहे. शिरगांव परिसरातील ग्रामस्थांनी खेड-पोसरे येथे २२जुलै.रोजी डोंगर खचून झालेल्या दुर्घटनेतील १७मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांची स्थलांतरीत करण्यात आलेल्या अलोरे या गावी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत दिली.
या दुर्घटनाग्रस्थ नातेवाईकांची मुले सुजल मोहिते(इ.१२ वी.),राणी मोहिते (इ.८वी.) या अनाथ मुलांना प्रत्येकी ९५०० रु.चा धनादेश व विनय मोहिते (वय-३वर्षे),विराज मोहिते (वय-४ वर्षे) यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रत्येकी ९०००रु.रोख देण्यात आले.

यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटना सिंधुदुर्ग चे अध्यक्ष किशोर कदम,उपाध्यक्ष विद्यानंद शिरगावकर,देवगड तालुकाध्यक्ष सूर्यकांत साळुंखे शिरगाव-शेवरे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच समीर शिरगावकर,अजय मोहिते व पोसरे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
या आर्थिक मदतीसाठी मुंबई-भायखळा येथील नायब तहसीलदार भरतकुमार नाईक,ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष मंगेश साळसकर,शिक्षक संघटनेचे सरचिटणीस संतोष क्षीरसागर, विद्यानंद शिरगावकर,सूर्यकांत साळुंखे,महेश कांबळे,सतीश तांबे,संदेश तांबे,विजय कदम,मनीष जोशी जुवाटकर, सुषमा सावंत,सुरेंद्र यादव महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सुपरवायझर संजय शंकर जाधव,जयानंद शिरगावकर,आमिष साळुंखे,संदीप कदम(जानवली),शिरगाव-शेवरे ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच समीर शिरगावकर आदींसह अनेकांनी सुमारे ४१०००/-रु.व वस्तुरुप मदत केली. शिरगांव गावच्या परिसरातील सामान्य ग्रामस्थांनी आपत्तीनिवारणीसाठी केलेली ही मदत एका वेगळ्या ग्रामीण सक्षमतेचाच नमुना आहे. सामान्य नागरीक स्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे शिरगांव माॅडेल भविष्यात इतर अनेक गावांना एक दिशा दाखवेल असा विश्वास अनेक समाज विश्लेषक व्यक्त करत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स