चिंदर कोरोना मुक्त गाव घोषित
चिंदर | विवेक परब : आज चिंदर येथे कोरोना योध्दा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार चिंदर ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. चिंदर गावात गेल्या पंधरा दिवसात एकही कोराना रुग्ण आढळला नाही. चिंदर सरपंच सौ.राजश्री कोदे यांनी आरोग्य अधिकारी डाॅ शामराम जाधव-आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र व चिंदर उपआरोग्य केंद्र अधिकारी, पोलिस पाटील यांच्या संमत्तीने चिंदर गाव कोरोना मुक्त गांव घोषित केला तसेच सरपंचानी कोरोना आवाक्यात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशास्वयंसेविका, अंगणवाडीसेविका, सामाजिक कार्यकर्ते यांचे आभार मानले. यावेळी मंडल अधिकारी पाटील, ग्रामविकास अधिकारी अनेक मान्यवर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)