नारींग्रे येथे २३ फेब्रुवारी रोजी गजानन महाराज प्रगटदिन सोहळा.
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील नारींग्रे येथील जयंत भावे यांच्या घरी बुधवार २३ फेब्रुवारी रोजी गजानन महाराज प्रगटदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त पहाटे साडे पाच पासून विजय ग्रंथ पारायण वाचन होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता गजानन महाराज महापूजा, अभिषेक, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ६.३०वाजता दत्तक्रूपा भजन मंडळ बावकरवाडी यांचे भजन,रात्रौ आठ वाजता कणकवली तिवरे येथील बुवा अजित गोसावी यांचे भजन, ९वाजता कणकवली येथील बुवा अभिषेक शिरसाट यांचे भजन तर रात्रौ १०.३०वाजता देवगड कालवी येथील गुणाजी कोयंडे यांचे भजन होणार आहे तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)