ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आंगणेवाडीची भराडीदेवी यात्रा कोरोनाचे सर्व नियम  पाळूनच..!

आंगणेवाडीची भराडीदेवी यात्रा कोरोनाचे सर्व नियम पाळूनच..!

प्रकाशन: 20 Feb 2022 10:46 PM
वाचन संख्या 190

आंगणे कुटुंबियांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले भाविकांनी सहकार्य करण्याचे नम्र आवाहन.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : आरोग्यविषयक खबरदारी म्हणून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २४ फेब्रुवारी २०२२ रोजी संपन्न होणाऱ्या आंगणेवाडी वार्षिकोत्सवात भक्तांनी गर्दी न करता कोरोना विषयी नियमांचे तंतोतंत पालन करीत सहभागी होऊन श्री देवी भराडीचे दर्शन घ्यावे असे विनम्र आवाहन आंगणे कुटुंबीय यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
कोरोनाची तिसरी लाट जरी ओसरत असली तरी आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने करोना प्रतिबंधक नियमांचे तंतोतंत पालन करणे अनिवार्य आहे. मुखपट्टी म्हणजे मास्क व सॅनिटरायझर बरोबर लसीकरणाचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे तसेच ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त नागरिकांनी उत्सवात सहभागी होणे टाळल्यास ते उचित ठरेल. ‌वार्षिकोत्सवात सहभागी होणारे छोटे मोठे व्यापारी बंधूंनी देखील त्यांच्यासाठी पारीत करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आंगणे कुटुंबियांना सहकार्य करावे आणि हा वार्षिकोत्सव दरवर्षीप्रमाणे कुठलेही गालबोट न लागता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततेत पार पडेल याची दक्षता घ्यावी.यात्रा कालावधीत आंगणे कुटुंबाच्या वतीने सर्वांना योग्य ते सहकार्य केले जाईल आणि हा यात्रा उत्सव चांगल्या पद्धतीने पार पडेल असे आंगणे कुटुंबाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स