मुणगे हायस्कुल येथे महाराजस्व अभियान..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : राज्य शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत श्री भगवती हायस्कुल मुणगे येथे विद्यार्थ्यांना विविध दाखले शाळेतच वितरित करण्यात आले. यावेळी शाळेतील २३ विद्यार्थ्यांना वय अधिवास , २ विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, १ विद्यार्थ्याला उत्पन्न दाखला वाटप करण्यात आले. यावेळी संस्था उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, प्र मुख्याध्यापक प्रसाद बागवे, जेष्ठ शिक्षिका श्रीमती एम. बी. कुंज तसेच शिक्षक, पालक, विध्यार्थी उपस्थित होते. देवगड तहसीलदार मारुती कांबळे,मंडळ अधिकारी राठोड , महा इ सेवा केंद्राचे सचिन परब यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रसाद बागवे यांनी परिश्रम घेतले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)