मालवणच्या मराठा शिक्षक संघटनच्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण उत्साहात..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या ‘मराठा शिक्षक संघटन’ मार्फत कुंभारमाठ येथे शिवजयंतीचे औचित्य साधत घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेतील ३० यशस्वी स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व शिवसंस्कार पुस्तके भेट देण्यात आली .
विजेते स्पर्धक खालीलप्रमाणे आहेत.
खुला गट- निबंधलेखन स्पर्धा
विषय- शिवरायांची प्रेरणा आणि वर्तमानाची घडण
प्रथम- दिक्षा सुमंत तोंडावळकर (मालवण)
द्वितीय- महेक इब्राहिम शेख (मालवण )
तृतीय- संपदा शिवराम गावडे (चौके)
उत्ते.१- राधिका राजन शेलटकर (मालवण)
उत्ते.२-पौर्णिमा प्रकाश गावडे(मालवण)
शालेय गट- निबंधलेखन स्पर्धा
विषय- सद्यस्थितीतील गडकिल्ले व शिवराय यांच्यातील संवाद
प्रथम- रिया गणेश गिरकर.(मसुरे)
द्वितीय- तनिष्क आशिष पेडणेकर (आचरा)
तृतीय- सिम्रन नितीन गांवकर (आचरा)
उत्ते.१)स्नेहलता सत्यविजय तेली (मालवण)
उत्ते.२) गायत्री संतोष गांवकर (मालवण)
शालेय गट-
चित्रकला,रंगभरण स्पर्धा
पहिला चित्रगट–
विषय- बालशिवाजी व जिजामाता.
प्रथम- तनिष के.खोत.
रोझरी इंग्लिश स्कुल
द्वितीय- स्वरा रुपेश बांदेकर
भंडारी प्राथमिक शाळा
तृतीय- ओम प्रसन्नकुमार वाघरे.
मालवण धुरीवाडा शाळा
उत्ते.१) गौरी पंढरीनाथ मसुरकर
मसुरे कावा शाळा
उत्ते.२)आराध्य अशोक थोरात.
दुसरा- चित्रगट
विषय- शिवाजी महाराज युद्धकला
प्रथम- अस्मी पंकज धुरी
मालवण दांडी शाळा
द्वितीय- वेदिका परशुराम लुडबे.
अंबाजी विद्यालय मालवण
तृतीय- प्रांजल संजयकुमार
कांदळगांव नं.१ शाळा
उत्ते.१-वेदिका विरेश पेडणेकर
मसुरे कावा शाळा
उत्ते.२-आनंदी विनोद सातार्डेकर.
तिसरा चित्रगट
विषय- शिवजन्मोत्सव
प्रथम- समर्थ दिनेश सावंत.
भंडारी प्राथमिक शाळा
द्वितीय- रुद्र रोशन तोडणकर
रोझरी इंग्लिश स्कुल
तृतीय- हरिश महेश परब
शाळा आचरे नं.१
उत्ते,१- दिक्षांत दीपक शिवापूरकर.(जयगणेश इंग्लिश स्कूल)
उत्ते.२-तनुजा धोंडु लाड.
सर्जेकोट-मिर्याबांदा शाळा
चौथा गट
विषय- बालशिवाजी खलबते
प्रथम- दुर्वा प्रसाद परब.(शाळा-मसुरे-देऊळवाडा)
द्वितीय- तन्मय रामचंद्र मेस्त्री
(शाळा-मसुरे-देऊळवाडा)
तृतीय- वेदांगी संदेश चेंदवणकर
(शाळा-चिंदर बाजार)
उत्ते.१-ऐश्वर्या सुजित तोंडवळकर
(कन्याशाळा-मालवण)
उत्ते.२-चैतन्य पराग पांचाळ.
(मसुरे-देऊळवाडा )
यावेळी व्यासपीठावर प्रेरक संघटक मार्गदर्शक श्रीकृष्ण सावंत, शिवराज सावंत, परमानंद वेंगुर्लेकर, राजेंद्रप्रसाद गाड, सुनील सावंत, देविदास प्रभुगावकर, सचिन घोटाळे, विकास घाडीगावकर,श्रीमती बांदेकर श्रीमती दाते मँडम उपस्थित होते.
याप्रसंगी श्री श्रीकृष्ण सावंत, श्री राजेंद्रप्रसाद गाड,श्री.शिवराज सावंत व श्री परमानंद वेंगुर्लेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर कु.अनुष्का चौगुले या शिवकन्येने अतिशय प्रभावीपणे शिवविचार व्यक्त करत वातावरण चैतन्यमय केले.
या कार्यक्रमासाठी अनेक मराठा शिक्षकांनी गेले आठ दिवस मेहनत घेतली श्री.बिभिषण चौगुले व श्री.पांडुरंग थेटे सर यांनी परिसर सफाईची जबाबदारी घेतली तर श्री. गणेश नाईक यांनी प्रमाणपत्र तयार करणे श्री शिवराज सावंत यांनी हॉल व बॅनरची सोय केली.श्री.राजेंद्रप्रसाद गाड यांनी बक्षीसासाठी लागणारी पुस्तके व प्रमाणपत्र छपाई केली इतर सर्व शिक्षक बांधवांनी आजच्या कार्यक्रमासाठी कार्यक्रम स्थळी सहकार्य केले.
जानकी मंगल कार्यालय चे मालक श्री.गांवकर यांनी शिवजयंती करिता हॉल सुविधा मोफत उपलब्ध करून दिली मराठा संघटन तर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवराज सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री घोडके सर यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)