ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शासनाचा रॅलीला नकार....आणि छत्रपतींनी दिला सामाजिक साक्षात्कार ..!  (विशेषवृत्त)

शासनाचा रॅलीला नकार....आणि छत्रपतींनी दिला सामाजिक साक्षात्कार ..! (विशेषवृत्त)

प्रकाशन: 20 Feb 2022 01:30 PM
वाचन संख्या 78

जाणत्या राजाच्या सेवा जाणिवेला जपत ‘शिवजयंती उत्सव समितीची’ शिवरायांची ‘शिवकृती वंदना..!’

वृद्धाश्रम, कातकरी बांधवांना मदत करून शिवजयंती साजरी.

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) विशेष वृत्त : :सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘शिवजयंती उत्सव समिती कणकवली’तर्फे कोणताही गाजावाजा न करता वृद्धाश्रम आणि कातकरी बांधवांना जीवनावश्यक साहित्य देऊन, सामाजिक बांधिलकी बाळगून शिवजयंती करण्यात आली. समितीने समाजासमोर आदर्श निर्माण केला असून या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंतीनिमित्त प्रतिवर्षी दुचाकी रॅलीचे आयोजन केले जाते. यावर्षी शासनाने रॅलीला बंदी घातल्यामुळे सामाजिक उपक्रमांद्वारे शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याचे ठरवले. समितीचे अध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे कोकणप्रांत सचिव प्रताप भोसले यांच्यासह कान्हा मालंडकर, संदीप चव्हाण, दिनेश सावंत, अनुप वारंग आदींच्या नेतृत्वाखाली समितीच्या सदस्यांनी उपक्रम यशस्वी केले.

कणकवली शहरातील गणपतीसाना येथे वर्षानुवर्षे झोपड्यांमध्ये राहणाऱ्या कातकरी बांधवांना पांघरूण, खुर्च्याची आवश्यकता असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार समितीतर्फे सर्व कातकरी कुटुंबांना ब्लॅकेट आणि खुर्च्या शिवजयंतीदिनी वाटण्यात आल्या. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते ॲड. सुदीप कांबळे यांच्यासह कातकरी समाजाचे सुनील पवार, बारक्या पवार, सखू पवार, पिंट्या निकम, विष्णू पवार आदी उपस्थित होते. ॲड सुदीप कांबळे म्हणाले, शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य रयतेचे अश्रू पुसण्याचे काम केले. त्याच मार्गावर शिवजयंती उत्सव समिती चालत असून त्यांनी कातकरी बांधवांना केलेली मदत महत्वपूर्ण आहे.
स्वस्तिक फाऊंडेशनच्या असलदे येथील दिवीजा वृद्धाश्रमात निराधार बांधव मोठ्या संख्येने असून समितीतर्फे आवश्यक वस्तूंची यादी वृद्धाश्रमाकडे मागण्यात आली. त्यानुसार चहा पावडर, मोहरी, जिरे, तूरडाळ, रवा, तेल, कांदे, बटाटे, साखर आदी साहित्य मोठ्या संख्येने शिवजयंतीदिनी आश्रमास देण्यात आले. याप्रसंगी वृद्धाश्रमाच्या संचालिका दीपीका रांबाडे, सायली तांबे, अस्मि राणे, सखाराम कोकरे, महादेव हुंबे, अनुजा आचरेकर, प्रमिला शेलार आदी वृद्धाश्रम कर्मचारी उपस्थित होते. दीपिका रांबाडे म्हणाल्या, शिवजयंती उत्सव समितीमुळे आश्रमात वेगळ्या प्रकारची शिवजयंती साजरी झाली. शिवाजी महाराजांची समाजसेवेची शिकवण शिवजयंती उत्सव अंगिकारत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.


प्रताप भोसले म्हणाले , आतापर्यंत रॅलीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचत होतो. मात्र , यावर्षी महाराजांनीच सामाजिक बुद्धि दिली आणि आज चांगले सामाजिक उपक्रम पार पडले. शासनाने रॅलीला परवानगी नाकारली आणि आम्ही अनोख्या उपक्रमाने शिवजयंती उत्सव साजरी केली.
समितीतर्फे बिडवाडी, वरवडे, कलमठ, कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक, शिवाजी महाराज चौक, सकल मराठा समाज आयोजित शिवजयंती उत्सव, शिवाजीनगर येथील शिवपुतळा, असलदे, कासरल, कसवण आदी ठिकाणी आयोजित शिवजयंती उत्सवांना भेटी देत शिवपुतळा, शिवप्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपक्रमप्रसंगी संजय साळसकर, सुदाम तेली, बाबू राऊळ, प्रदीप सावंत, संतोष पुजारे, सुभाष मालंडकर, आनंद बांदल, आनंद घाडी, विकास राणे, आनंद साटम, नितीन पेडणेकर, अमित पवार, प्रभाकर देसाई, प्रसाद बावकर, रुपेश परब, रुपेश नाडकर्णी, सुफियान शेख, प्रशांत पुजारे, शैलेश चव्हाण आदी समितीसदस्य उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स