ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या पहिल्या काव्यपुरस्कार प्रदान सोहळ्यात होणार कविसंमेलन..!

सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या पहिल्या काव्यपुरस्कार प्रदान सोहळ्यात होणार कविसंमेलन..!

प्रकाशन: 20 Feb 2022 01:06 PM
वाचन संख्या 40

विशाखा पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी प्राध्या.मोहन कुंभार असणार कविसंमेलनाचे अध्यक्ष…!

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान’ तर्फे मंगळवार दिनांक 1 मार्च रोजी सायं. 4.30 वाजता मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली येथे आयोजित सरस्वती लक्ष्मण पवार पहिल्या राज्यस्तरीय काव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे औचित्य साधून खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गातील कवींना स्वरचित कविता वाचनाची संधी या कवी सम्मेलनात मिळणार आहे. कवी संमेलनात सहभागी होण्यासाठी खालील मोबाईल नं. वर आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन प्रतिष्ठानच्या सचिव शुभांगी पवार यांनी केले आहे.
सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पहील्याच राज्यस्तरीय काव्यपुरस्कारासाठी सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा पिंकी शेख यांच्या कुरूप या काव्यसंग्रहाची निवड झाली आहे. ज्येष्ठ लेखक ‘उचल्या’ कार लक्ष्मण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या सत्रात या पुरस्काराचे वितरण होईल आणि दुसऱ्या सत्रात विशाखा पुरस्कार प्राप्त नामवंत कवी प्रा. मोहन कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली खुले कविसम्मेलन संपन्न होईल.
प्रा. मोहन कुंभार यांचा ‘जगण्याच्या गाथा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित असून अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या कविसंमेलनात त्यांनी निमंत्रित कवी म्हणून काव्य वाचन केले आहे. अखिल भारतीय गोमंतक युवा साहित्य सम्मेलन तसेच दुसऱ्या नारायण सुर्वे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्थान त्यांनी भूषविले आहे. मराठीतील नामवंत, दर्जेदार नियतकालिकांमध्ये सातत्याने त्यांच्या कवितांना स्थान मिळाले आहे. अण्णाभाऊ साठे आदर्श साहित्यिक पुरस्कार, यशवंतराव चव्हाण काव्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांसोबतच मराठी साहित्यातील मानाच्या ‘विशाखा पुरस्कारा’ ने सुद्धा ते सन्मानित आहेत. तसेच मुंबई विद्यापीठाच्या बीए प्रथम वर्ष अभ्यासक्रमात कवितेचा समावेश झालेला आहे.
तरी, साहित्य-काव्य रसिकांनी या सम्मेलनात आवर्जून उपस्थित रहावे आणि ज्या कवींना आपली कविता या काव्यसम्मेलनात सादर करावयाची आहे त्या कवींनी पुढील मोबाईल नंबरवर आपली नाव नोंदणी करावी असे प्रतिष्ठानतर्फे स्पष्ट केले गेले आहे.
संपर्क : सुरेश पवार – 9422633118 आणि मीनाक्षी चव्हाण – 8805645382.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स