ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाली उत्साहात शिवजयंती साजरी..!

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाली उत्साहात शिवजयंती साजरी..!

प्रकाशन: 20 Feb 2022 12:47 PM
वाचन संख्या 53

चिंदर |विवेक परब : ‘ह्युमन राईट असोशिएशन फाॅर प्रोटेक्शनच्यावतीने’ काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कणकवलीतील शिवाजी चौक या ठिकाणी जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व कणकवली तालुका अध्यक्ष हनीफभाई पिरखान यांनी कणकवली तालुका सचिव मनोजकुमार वारे सदस्य भरत तळवडेकर ;सादिक कुडाळकर यांच्या उपस्थितीत शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे मालवण तालुक्यात शिव पुतळ्याला मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी यांनी पुष्पहार अर्पण केला. सोबत जनसंपर्क अधिकारी महेश मयेकर व सदस्य हजर होते. देवगड तालुकाध्यक्ष योगेश उर्फ बाळा धुपकर व सदस्य. वैभववाडी तालुकाध्यक्ष प्रकाश नारकर,उपाध्यक्ष दशरथ बोबकर व अन्य पदाधिकारी व सदस्य. सावंतवाडी तालुकाध्यक्ष मोहिनी मडगावकर,व पदाधिकारी व सदस्य. कुडाळ तालुकाध्यक्ष डॉ.अरुण गोडकर, कार्याध्यक्ष डॉ. वैभव आईर , वेंगुर्ला तालुकाध्यक्ष डॉ.आर.एम.परब यांनी आपापल्या तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य यांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स