ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली पंचायत समिती येथे आवास अभियान ग्रामीण पुरस्कारांचे वितरण

कणकवली पंचायत समिती येथे आवास अभियान ग्रामीण पुरस्कारांचे वितरण

प्रकाशन: 15 Aug 2021 12:44 PM
वाचन संख्या 84

कणकवली / उमेश परब – महाराष्ट्र शासन पुरस्कृत आवास अभियान ग्रामीण पुरस्कारांचे वितरण आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यात कणकवली तालुक्यातील फोंडाघाट ग्रामपंचायत ने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार २० नोव्हेंबर २०२० ते ०५ जून २०२१ या कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था तथा व्यक्तींना प्रधानमंत्री आवास अभियान ग्रामीण पुरस्कार वितरण सोहळा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली पंचायत समिती येथील प. पु. भालचंद्र महाराज सभागृहात पार पडला. यात सर्वोत्कृष्ठ क्लस्टर पुरस्कार जिल्हा परिषद मतदार संघ ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सागर सुतार यांना प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम क्रमांक फोंडाघाट ग्रामपंचायत, द्वितीय क्रमांक हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायत तर तृतीय क्रमांक वागदे ग्रामपंचायत यांना गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट घरकुल प्रथम क्रमांक असलदे येथील सचिन परब द्वितीय क्रमांक हरकूळ खुर्द येथील सुभाष परब, तर तृतीय क्रमांक वागदे गावातील शंकर घाडीगांवकर यांनी पटकाविला त्यांना आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच रमाई आवास योजनेत सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्कार जाणवली मतदार संघाचे ग्रामीण गृह अभियंता सागर सुतार यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत मध्ये प्रथम क्रमांक शिवडाव ग्रामपंचायत, द्वितीय क्रमांक फोंडाघाट ग्रामपंचायत, तृतीय क्रमांक पियाळी ग्रामपंचायत यांनी पटकावला तर सर्वोत्कृष्ट घरकुल योजनेत प्रथम क्रमांक तरंदळे गावातील भरत कदम, द्वितीय क्रमांक अनिता जाधव, तृतीय क्रमांक नाटळ येथील संजना तांबे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, प्रकाश पारकर, जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, हर्षदा वाळके, सुजाता हळदिवे, महेश लाड, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय पोळ, संदीप मेस्त्री आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स