असलदेत रामेश्वर क्रिकेट मंडळाच्या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ.
३० संघांनी घेतलाय सहभाग; उद्या रंगणार अंतिम सामन्याचा थरार….!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : रामेश्वर क्रिकेट मंडळ असलदे आयोजित एक साईड पंचक्रोशी व एक साईड ओपन क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ सरपंच पंढरी वायंगणकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.तर मैदानाचा शुभारंभ सोसायटी चेअरमन भगवान लोके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या स्पर्धेत ३० संघांनी सहभाग घेतला आहे. उद्या रविवारी अंतिम सामन्याचा थरार असलदे मधलीवाडीच्या मैदानावर रंगणार आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने श्री.माऊली देवीच्या प्रतिमेला माजी सोसायटी चेअरमन प्रकाश परब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी उपसरपंच संतोष परब,व्हाईस चेअरमन दयानंद हडकर,तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे,परशुराम परब,रामचंद्र लोके गुरुजी,माजी सरपंच लक्ष्मण लोके,शामराव परब,पंकज आचरेकर,सचिन लोके,महेश लोके,भालचंद्र लोके,महेंद्र हडकर, रघुनाथ लोके,प्रशांत परब,अनिल नरे,विजय आचरेकर, देवेंद्र लोके,नाना लोके,कोतवाल मिलींद तांबे आदींसह गावातील ग्रामस्थ व खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रामेश्वर क्रिकेट मंडळ असलदे या मंडळाच्या वतीने सलग १२ वर्षे ही स्पर्धा भरवली जात आहे.
या क्रिकेट स्पर्धेचे प्रथम विजेता संघाला १६,२२२ रुपये व चषक,द्वितीय विजेत्या संघाला ९,०२२ रुपये व चषक,उत्कृष्ट फलंदाज ५०१ रुपये ,सामनावीर ५०१ रुपये,शिस्तबद्ध संघ ५०१ रुपये पारितोषिके देण्यात येणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)