ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
दोन मालवणी कवी…मराठी भाषा गौरव दिनादिवशी नेणार 'मनातील कवितांच्या' गावी..!

दोन मालवणी कवी…मराठी भाषा गौरव दिनादिवशी नेणार 'मनातील कवितांच्या' गावी..!

प्रकाशन: 18 Feb 2022 02:34 PM
वाचन संख्या 200

मालवण | सुयोग पंडित : मालवणातील बॅरि.नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर धुरीवाडा,मालवण येथे २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शब्दप्रसिद्ध कवी दादा मडकईकर आणि सजीव मालवणी जाणिवांचे कवी रुजारिओ पिंटो त्यांच्या त्यांच्या साहित्यीक भात्यातली ‘मनातली कविता’ उलगडून दाखवणार आहेत.
बॅरि.नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर धुरीवाडा,मालवण येथे २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून वास्तववादी ग्रामीण आणि मालवणी कवितांच्या सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता संस्थेच्या दादा शिखरे सभागृहामध्ये हा काव्य सोहळा रंगणार आहे.
या अनोख्या मैफिलीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व मालवण तालुक्यातील काव्य रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन साने गुरुजी वाचन मंदिर चे कार्याध्यक्ष श्री.रुजारिओ पिंटो यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स