पळसंब गावात शिवजयंती उत्सवाचे शानदार आयोजन..!
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गावात ‘शिवजयंती उत्सव http://localhost/news/public/uploads/2022’ ची तयारी जोमाने झाली आहे.
श्री.जयंतीदेवी सांस्कृतिक,कला ,क्रिडा मंडळ पळसंब यांच्या आयोजनाद्वारा हा सोहळा संपन्न होत आहे. हा सोहळा 19 फेब्रुवारीला सकाळी 09:00 वाजता श्री.जयंती देवी मंदिराकडून ढोल ताशांच्या पथकासह मिरवणुकीद्वारा सुरु होईल. दुपारी 11 वाजता पळसंब शाळा क्रमांक 1 च्या रंगमंचावर छत्रपती शिवराय पुतळ्याला वंदन तथा मुजरा करुन शाळेतील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. दुपारी 12 वाजता या सोहळ्याचा समारोप होईल.
या सोहळ्याला सर्व ग्रामस्थांनी व स्थानिक तसेच जिल्ह्यातील शिवप्रेमींनी उपस्थित रहायचे आवाहन पळसंबचे सरपंच चंद्रकांत गोलतकर ,ग्रामपंचायत सदस्य आणि आयोजक श्री जयंतीदेवी सांस्कृतिक,कला,क्रिडा मंडळाने केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)