मराठा समाज शिक्षक बांधवांच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव व आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त यांचा सत्कार सोहळा संपन्न.
शिरगांव /संतोष साळसकर : ‘मराठा नाट्यगृह कणकवली’ येथे नुकताच मराठा समाज शिक्षक बांधवांच्यावतीने इ.५वी शिष्यवृत्ती, इ.८ वी शिष्यवृत्ती,नवोदय विद्यालय प्रवेश,इ १० वी,१२ वी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच रोटरी क्लब सिंधुदुर्ग यांच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार व सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त नांदगाव-मधलीवाडी येथील प्रशालेच्या पदवीधर शिक्षिका सौ.प्रियांका विजय भोगले यांचा तसेच अखिलभारतीय साने गुरुजी कथामाला मालवण आयोजित कै. जी.टी. गांवकर सेवामयी आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त चाफेड-भोगलेवाडी प्रशालेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ.रश्मी रामचंद्र आंगणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या सुरवातीला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे होते.यावेळी कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस,हरकुळ बुद्रुक चे केंद्रप्रमुख विजय भोगले,ए. डी.राणे,शिक्षक बँक संचालक दत्ता सावंत,स्नेहलता राणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सेवानिवृत्त समाजबांधवांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी सत्कारमूर्ती सौ. प्रियांका भोगले,सौ.रश्मी आंगणे,प्रतीक्षा तावडे,स्नेहलता प्रास्ताविक प्रशांत दळवी,बहारदार सूत्रसंचालन शाम सावंत यांनी केले तर आभार हेमंत राणे यांनी मानले.यावेळी विद्यार्थी,पालक,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)