ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. मोरे यांची बदली रद्द करायची मागणी...!

सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. मोरे यांची बदली रद्द करायची मागणी...!

प्रकाशन: 17 Feb 2022 08:55 PM
वाचन संख्या 56

खास. विनायक राऊत, आम. वैभव नाईक यांची नाम.अमित देशमुख यांच्याकडे मागणी.

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) :सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. एस. एस. मोरे यांची बदली जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज यावर्षी पासून सुरु होत असल्याने डॉ. एस. एस. मोरे यांची बदली रद्द करून त्यांची पूर्ववत सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन म्हणून नेमणूक करण्यात यावी अशी मागणी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन केली. त्याबाबतचे निवेदनही देण्यात आले. याची दखल घेत ना.अमित देशमुख यांनी डॉ. एस. एस. मोरे यांची बदली रद्द करण्याचे मान्य केले आहे. अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली.
सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज मंजुरीसाठी सहकार्य केल्याबद्दल नाम. अमित देशमुख यांचे खास. विनायक राऊत, आम. वैभव नाईक यांनी आभार मानले. तसेच मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया सुरु करणे,पुढील कार्यवाही तसेच आवश्यक सोयी सुविधा व इतर विषयांवर याप्रसंगी चर्चा करण्यात आली. तसेच लवकरच ओरोस येथील शासकीय मेडिकल कॉलेजला भेट देण्यासाठी ना. देशमुख यांना निमंत्रित करण्यात आले. सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजसाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासन स्तरावर कोणतीही मदत कमी पडू देणार नाही अशी ग्वाही ना. देशमुख यांनी यावेळी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स