कणकवलीजवळील वागदे येथे कंटेनर पलटला..
उमेश परब | प्रतिनिधी : मुंबई-गोवा हायवे महामार्गावर वागदे येथे सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान कुडाळ ते कणकवली च्या दिशेने जाणारा कंटेनर वागदे पाताडे स्टॉप येथे पलटी होत चालक गंभीर जखमी झाला.
ही अपघाताची घटना कळताच स्थानिक वागदे रहिवाशी संदीप सावंत, रुपेश आंबडोसकर, दीपक गोसावी,ललित घाडीगांवकर, पिंट्या ताटे,समर सिंग,धीरज चरपे, यांनी मदत कार्य करत गंभीर जखमीला रुग्णालयात हलविण्यात आले आहे . यावेळी दिलीप बिल्डकॉन कंपनी च्या रुग्णवाहीकेने अपघातग्रस्त चालकाला रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती समजताच वाहतूक पोलीस व कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)