ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तुकडा तुकडा तळाशिल आणि स्वातंत्र्याची जिलेबी…!

तुकडा तुकडा तळाशिल आणि स्वातंत्र्याची जिलेबी…!

प्रकाशन: 15 Aug 2021 01:40 AM
वाचन संख्या 221

संपादकीय विशेष : मालवण.
भारत देशाचा पंचाहत्तरावा स्वातंत्र्यदिन उगवलाय. अनेक आपत्तीतही उसळून उभा रहाणारा आपला प्रत्येक देशबांधव अगदी आनंदाने वगैरे जरी नाही तरी आदराने हा दिवस जगत आलाय.
आजचा दिवस सगळी हतबलता आणि मरगळ ह्यांना झटकून टाकायचा अख्ख्या देशाचा एक अखंड सणच आहे.
शासकीय, प्रशासकीय आणि खासगी स्तरावरसुद्धा अतिशय शिस्तबद्धपणे हा सण साजरा केला जाणार आहे.
स्वातंत्र्यदिनाची अगदी आवडीने खाल्ली जाणारी ,भरवली जाणारी जिलेबी अगदी घरच्या कार्याच्या प्रसादासारखीच वाटली जाणार आहे..
अवघा देश,अवघे राज्य, अवघा जिल्हा,अवघा तालुका, अवघे शहर ,अवघा गांव ह्या जिलेबीला मुखी लावणार आहे असंच वाटत असताना एक अख्खा गांव मात्र अगदी आजपासूनच जिलेबीच काय तर कुठलाच पदार्थ न खाण्याच्या हट्टाला पेटून उठलाय..खरंतर पेटून नाही तर विझून थकलाय म्हणणं उचित् ठरेल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळाशिल हाच तो गांव. आजपासूनच आपली चूलच बंद करुन बसणार आहे. कारण आहे त्याची होणारी धूप आणि त्याचे पडत चाललेले तुकडे..!
निसर्गाचे वरदान लाभलेला आणि त्याच निसर्गाचा शापही भोवणार्या काही दुर्मिळ घटक गावातील एक गांव आहे हा तळाशिल.
चौदाशे लोकवस्तीचा हा गांव तसं एक चिंचोळे बेट. एका बाजूने डोंगराने त्याची कूस आंदण दिल्यामुळे बेट या व्याख्येत न बसल्याने त्याचा बेट असा शास्त्रीयपणे उल्लेख करता येत नाही परंतु ढोबळमानाने तळाशिल हे बेटच.
वाळू आणि फक्त वाळूचाच पाया किंवा जमिन असलेले हे बेट गेले पंचवीस वर्षे निसर्गाच्या विविध वादळ,त्सुनामी आणि भीषण वार्यांना सहन करत करत समुद्री लाटांच्या तडाख्याने समुद्रातच गिळंकृत होत चाललंय.
एका बाजुने समुद्र आणि दुसर्या बाजुला खाडी अशा स्थितीतील खाडी सुद्धा आता तळाशिलची साथ द्यायच्याऐवजी समुद्राच्या भेटीला उत्सुक होऊ लागली आहे आणि ह्या मध्ये आहेत तळाशिल गावचे चौदाशे माणसांचे प्राण.
खाडीचे रौद्र हे वाळू उत्खनन या मानवनिर्मित प्रक्रियेतून जरी घडले असले तरिही त्याची परिणीती मानवाच्या नाशाकडेच घेऊन चाललीय.
गावच्या देवाची पालखी ज्या रस्त्याने जाते ती देवाची वाटही अगदी आखुड करुन त्यावरून पालखी न्यावी लागते यावरुन तळाशिलमधल्या ग्रामस्थांची मनःस्थिती किती भेदरलेली असेल त्याची कल्पना येईल.
पंधरा वर्षे ,शेकडो निवेदने यानंतर कालच दोन ठिकाणी बंधारे घालायला परवानगी जरुर मिळाली परंतु ते बंधारे तुकड्या तुकड्यात आहेत.
संपूर्ण तळाशिल गावाला इंग्रजी यू अक्षराप्रमाणे सलग संरक्षक बंधार्याची आवश्यकता आहे कारण तुकड्या तुकड्यातील बंधार्यांमध्ये ज्या शेकडो मीटर्सच्या फटी रहाणार आहेत त्यांतून समुद्राचे पाणी आणखी जोमाने तळाशिलात घुसणार हे शास्त्रीय सत्य आहे.
एकदा का मोठी लाट आली किंवा तुकड्या तुकड्याचे दोन बंधारे घातले गेले तर तळाशिल संपूर्णपणे वाहून जायला केवळ एक तासाचा कालावधीही पुरेसा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे….
इथला प्रत्येक ग्रामस्थ ह्याच तळाशिलवर लहानाचा मोठा झालाय.
तळाशिलचे संरक्षक अवयव निखळून पडताना पहायचे धैर्य आता कुठलाच ग्रामस्थ उसनं आणू शकत नाही आहे.
त्याच सलग धूपप्रतिबंधक बंधार्यासाठी अख्खा गांव आज सकाळी अकरा वाजल्यापासून बेमुदत उपोषण करणार आहे.
लहान,वृद्ध वगैरे भेद न ठेवता एकजुटीने सगळे बेमुदत चूलबंद आंदोलन करणार आहे. काही युवक तर समुद्रात बसून आंदोलन करणार आहेत.
तळाशिल मधील चौदाशे जणांच्या एकेका प्राणाचे पाच लाख रुपये गृहीत धरुन जी बेरीज येईल त्याचा अर्धा निधी सरकारने तळाशिलच्या बंधार्याला द्यावा आणि नंतर तळाशिलला काहीही देऊ नये असे निर्वाणीचे सांगत इथला ग्रामस्थ विझत चाललाय….पेटत नाही तर विझत चाललाय. किती मीटर लांबीचे बंधारे मंजूर झाले आहेत, नेमके कोणते पर्यावरणाचे नियम आड येतायत ह्या मुद्द्यांपलिकडेही जाऊन ‘तळाशिल तुटतंय’ एवढं कळणं हीच गरज आहे.

स्वातंत्र्यदिनादिवशी तळाशिलवासियांची सलग संरक्षण बंधारा हवी असलेली गरजेची अख्ख्या जिलेबीची मागणी पूर्ण होवो आणि स्वातंत्र्य उत्सवाची गोड जिलेबी तळाशिलवासियांना खायला मिळो इतक्या शुभेच्छा आपण नक्कीच देऊ शकतो…
नाही का..? आपली सिंधुनगरी चॅनेल

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 445

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स