ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांद्यातील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने आजोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

बांद्यातील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने आजोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

प्रकाशन: 16 Feb 2022 01:02 AM
वाचन संख्या 38

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बांदा येथील ‘शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने शिवमहोत्सव कार्यक्रमातर्गंत’ बांदा गांव मर्यादित आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. या स्पर्धत २१४ विद्यार्थी सहभागी झाले होते.
ॲड.विठ्ठल परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उपाध्यक्ष तेजस परब ,सचिव अनुज बांदेकर ,बांदा शाळेच्या पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये,चित्रकार राहूल परब,विरेंद्र मांजरेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्यामध्ये बालवयातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची रूजवणूक होणेसाठी संस्थेच्या वतीने चित्रकला, वक्तृत्व ,रांगोळी,वेशभूषा,पोवाडागायन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.चित्रकला स्पर्धेत पहिली ते चौथीच्या गटात ११४,पाचवी ते आठवीच्या गटात ९१ व खुल्या गटात९विदयार्थी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भूषण सावंत यांनी केले प्रास्ताविक जे.डी.पाटील तर आभार महादेव धुरी यांनी केले.


कार्यक्रत यशस्वी पार पाडण्यासाठी संतोष मांजिलकर ,लक्ष्मण कळंगुटकर ,नारायण बांदेकर, प्रथमेश राणे, जयेश म्हाडगुत, रणजित बांदेकर, केदार कणबर्गी, अजय आरोसकर ,सोनू बांदेकर, लक्ष्मण घोगळे, अमोल माळवदे,संकेत वेंगुर्लेकर, अक्षय मयेकर व स्वयंसेवक दीक्षा गवस,तृप्ती गवस,सिध्दांत नाटेकर यांनी परिश्रम घेतले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स