इन्सुलीतील आत्माराम उर्फ जान्तेलो लाडू कोठावळे यांचे निधन.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली बिलेवाडी येथील नाट्यकर्मी तथा प्रगतशील शेतकरी आत्माराम उर्फ जान्तेलो लाडू कोठावळे (वय ७६) यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, विवाहित मुलगी, सुन, जावई व नातवंडे असा परिवार आहे. इन्सुली गावातील सांस्कृतिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. त्यांनी अनेक सामाजिक, ऐतिहासिक नाटकात भूमिका बजावल्या होत्या. त्यांना नाट्यकर्मी म्हणून ओळखले जात असे.त्यांचा बैलगाडीचा व्यवसाय होता. दुग्धव्यवसायिक विकास कोठावळे यांचे ते वडिल होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)