ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आंगणेवाडीच्या मालवणी 'टॉवर' ची रेंज आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत..!

आंगणेवाडीच्या मालवणी 'टॉवर' ची रेंज आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत..!

प्रकाशन: 16 Feb 2022 12:24 PM
वाचन संख्या 570

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीचे संकेत आंगणे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या मालवणी भाषेतील ‘ टॉवर’ या शॉर्ट फिल्मला ‘काशी इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये ‘बेस्ट लॉंग शॉर्ट’ फिल्म पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
कुतुहला फिल्म्स प्रस्तुत प्रविण गंगवानी यांनी या फिल्मची निर्मिती केली आहे. तर आंगणेवाडी येथील जयेश आंगणे, देवेंद्र आंगणे, दिनेश आंगणे आणि रुचिता शिर्के यांनी अभिनयाची बाजू दमदार पणे सांभाळली आहे. यापूर्वी या शॉर्ट फिल्मला
शॉर्ट एड इंडिया आणि दहाव्या मुंबई शॉर्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये बेस्ट फिल्म ऑफ द मंथ आणि बेस्ट फिल्म ऑफ द इयर पुरस्कार, मुंबई शॉर्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये ज्युरी बेस्ट ऍक्टर पुरस्कार, मुंबई इंडिपेंडेंट फिल्म फेस्टिव्हल मध्ये बेस्ट ऍक्टर आणि बेस्ट फिल्म पुरस्कार प्राप्त झाला आहे. या शॉर्टफिल्मचे चित्रीकरण आंगणेवाडी, मसुरे, बांदिवडे, तोंडवळी, कांदळगाव, तळाणी, देऊळवाडा या ठिकाणी झाले आहे. तसेच आंगणेवाडी नाट्य मंडळ, कोंकनस्मार्ट शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स, देवेंद्र आंगणे, शेखर मराठे, सत्यजित आंगणे, ऋषी देसाई यांचे विशेष सहाय्य लाभले आहे. आंगणेवाडी मधील युवकांच्या या यशाबद्दल त्यांची कला प्रशंसा व प्रयत्नांचे कौतुक होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स