ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरण व सुशोभीकरणासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे वैयक्तिक  मानधनातील ९० हजार रुपयांची रक्कम देणार..!

कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरण व सुशोभीकरणासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे वैयक्तिक मानधनातील ९० हजार रुपयांची रक्कम देणार..!

प्रकाशन: 15 Feb 2022 07:17 PM
वाचन संख्या 58

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण व स्थलांतराला करिता शहराचा प्रथम नागरिक म्हणून कणकवली शहरातील सर्व्हिस रोडवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरण व सुशोभीकरणासाठी सहा महिन्याचे नगराध्यक्षपदाचे मानधन सुमारे ९० हजार रुपयांची रक्कम छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ यांना देण्याची घोषणा कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली.

यापूर्वी नगराध्यक्षपदाचे मानधन रोजंदारीवर असणाऱ्या मजुरांना ‘कमळ थाळी’ करिता व त्यापूर्वी नगराध्यक्षपदाच्या मानधनाची रक्कम ‘शहीद जवानांच्या’ कुटुंबियांना देण्यात आली होती. त्याच प्रमाणे पुढील सहा महिन्याचे मानधन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकरिता देण्यात येणार आहे.

यापूर्वी कणकवली नगरपंचायतकडून पुतळा स्थलांतरणा करिता पाचशे चौरस फुटाच्या जागेचा ठराव व त्या अनुषंगाने बाबी नगरपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवल्या आहेत. पालकमंत्री आणि आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून पुतळा स्थलांतरण या संदर्भात पाठपुरावा सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना, पालकमंत्र्यांकडून या १८ गुंठे जागेची मोजणी देखील करून घेण्यात आली. त्यामुळे कणकवली शहराचा प्रथम नागरिक म्हणून मी या कामाकरिता माझा हातभार लागावा म्हणून हा निर्णय घेतल्याचे नलावडे यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजीत मुसळे, ॲड. विराज भोसले, महेश सावंत आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स