ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवलीत १ मार्च रोजी होणार सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या 'सरस्वती लक्ष्मण पवार काव्य पुरस्काराचे'   वितरण...!

कणकवलीत १ मार्च रोजी होणार सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या 'सरस्वती लक्ष्मण पवार काव्य पुरस्काराचे' वितरण...!

प्रकाशन: 15 Feb 2022 06:26 PM
वाचन संख्या 57

कवयित्री दिशा पिंकी शेख यांना जाहीर झालाय पुरस्कार.

सुप्रसिद्ध लेखक तथा ‘उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानचा पहिला राज्यस्तरीय सरस्वती लक्ष्मण पवार काव्य पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा पिंकी शेख यांना जाहीर झालेला असून मंगळवार दि. 1 मार्च, http://localhost/news/public/uploads/2022 रोजी कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे सायंकाळी 4.30 वाजता होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ लेखक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. रोख रक्कम 10,000 रु. आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
तृतीयपंथी म्हणून हिणवून गणल्या गेलेल्या आणि एकूणच समाजव्यवस्थेने नेहमीच अमानवीय वागणूक दिलेल्या माणुस असलेल्या हिजडा समूहाचे दुःख आणि वेदना मांडणारी दिशा पिंकी शेख यांची कविता आपल्या भवतालाचा एक क्रूर चेहरा आपल्याला दाखवते. या तळाशी फेकल्या गेलेल्या वर्गाला सर्वसामान्यांशी जोडून घेणारा दिशा पिंकी शेख यांचा ‘कुरूप’ हा काव्यसंग्रह या सन्मानाला सर्वार्थाने योग्य आहे.

सदर पुरस्कार सोहळ्यासाठी ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित यांना प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित केले आहे.

तसेच सिंधुदुर्ग येथील ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी आणि समाजसेवक संदीप परब, प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. शमिता बिरमोळे यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व साहित्य रसिकांनी या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या सचिव शुभांगी पवार यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स