ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'दर्याचा राजा' अरुण पेदे वेसावकर यांचा ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट महाराष्ट्रच्या वतीने होणार सत्कार..!

'दर्याचा राजा' अरुण पेदे वेसावकर यांचा ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट महाराष्ट्रच्या वतीने होणार सत्कार..!

प्रकाशन: 13 Feb 2022 05:05 PM
वाचन संख्या 177

कोळीगीतांच्या संस्कृतीचे आंतरराष्ट्रीय आयकाॅन व्यक्तिमत्व मुंबईत गौरवले जाणार..!

मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्राच्या कोळीगीत व नृत्य संस्कृतीला सातासमुद्रापार रशिया,फ्रांस,बहरीन,दुबई अशा विविध देशांत अभिमानाने पोहोचवणारे अरुण पेदे वेसावकर यांचा ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट महाराष्ट्रच्या वतीने गौरव होणार असल्याची घोषणा असोसिएशनद्वारा केली गेली आहे.
श्री.अरुण पेदे वेसावकर यांनी त्यांचा संगीत क्षेत्रामध्ये गेली चाळीसपेक्षा जास्त वर्षे देऊन एक अमूल्य योगदान देत रसिकांची त्यांच्या कलेच्या माध्यमातून सेवा केली व सोबतच महाराष्ट्राची संस्कृती जपली.


त्यामुळे ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबईच्या वतीने दिनांक 26 फेब्रुवारी http://localhost/news/public/uploads/2022 रोजी त्यांचा ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट महाराष्ट्र यांच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे.
मुंबईत परेल येथील भावसार सभागृह,महाजन वाडी इथे हा सत्कार केला जाईल.

ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र ,मुंबईचे अध्यक्ष श्री सुभाष जाधव,सेक्रेटरी श्री महेश प्रसाद लिमये ,खजिनदार श्री संतोष पांचाळ आदी पदाधिकार्यांनी अधिकृत पत्राद्वारा श्री अरुण पेदे वेसावकर यांना या जाहीर सत्काराचे निमंत्रण पाठवले आहे.
या सत्काराने लोककलावंताचा त्याच्याच मातीत होणारा सन्मान हा सर्वोच्च असल्याची प्रतिक्रिया श्री अरुण पेदे वेसावकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स