ओटवची कु. रंजीता पाटील पाढे पाठांतर स्पर्धेत राज्यात प्रथम!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन आणि ॲप मॅप एपीक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सादरीकरण स्पर्धा पर्व ३ मध्ये ओटव- ओटववाडी शाळेची विद्यार्थिनी रंजीता संभाजी पाटील हिने राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. या स्पर्धेसाठी रोख रक्कम अकरा हजार रुपये प्रशस्तीपत्र व व पुढील उत्तम गणितीय प्रवासासाठी अंकनादतर्फे सभासदत्व देण्यात आले आहे. तिच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती ओटव- ओटववाडी, ओटव सरपंच हेमंत परुळेकर, शाळेचे मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)