ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयामध्ये शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयामध्ये शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा.

प्रकाशन: 13 Feb 2022 03:31 PM
वाचन संख्या 35

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले येथे प्रतिवर्षाप्रमाणे प्रमाणे शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खुला गट व शालेय गट ( १ली ते १०वी पर्यंत) अशा दोन गटात ही स्पर्धा गुरुवार दि.१७ फेब्रुवारी २०२२ सकाळी ०९.०० वाजता होणार आहे.खुल्या गटासाठी ‘छत्रपती शिवरायांचे जलदुर्ग व आरमार धोरण’ आणि शालेय गटासाठी ‘छत्रपती संभाजी महाराजांची युद्धनीती’ असे विषय असून खुला गट प्रथम क्रमांक रु १५००/-,द्वितीय रु.११००/-,तृतीय रु.७५० /-व उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय प्रत्येकी रु.५०० /- आणि शालेय गट प्रथम क्रमांक रु १०००/-, द्वितीय रु७५० /-,तृतीय रु.५००/- व उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय प्रत्येकी रु.२५०/-,सर्वांना चषक व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे असे बक्षिसांचे स्वरूप आहे.
खुला गटासाठी किमान ०८ व कमाल १० मिनिटे व शालेय गट किमान ०६ व कमाल ०८ मिनिटे वेळ आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी संजय पाटील (9890694709) व सुनील आळवे (9421631147) यांच्याशी संपर्क साधावा.
तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स