ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
दूध संकलनासाठी द्वारका दूध व्यावसायिक संस्था दूध डेअरीचे सतीश सावंत यांच्या हस्ते उद्घाटन.

दूध संकलनासाठी द्वारका दूध व्यावसायिक संस्था दूध डेअरीचे सतीश सावंत यांच्या हस्ते उद्घाटन.

प्रकाशन: 10 Feb 2022 09:03 PM
वाचन संख्या 84

कणकवली | उमेश परब : (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्गातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळावा यासाठी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते हरकुळ बुद्रुक येथे द्वारका सहकारी दूध व्यवसायिक संस्था चे उद्घाटन आज सकाळी फीत कापून करण्यात आले. यावेळी सावंत यांनी बोलताना सांगितले की सिंधुदुर्गातील दूध उत्पादक शेतकरी हे कोल्हापूर येथील दूध डेअरी मध्ये दुध पाठवतात पण त्यासाठी दुधाचे संकलन करावे लागते ते संकलन या द्वारका डेअरीच्या माध्यमातून हरकुळ बुद्रुक व आजूबाजूच्या गावांमधील दूध संकलन या डेरी मध्ये करण्यात येणार असल्याची माहिती माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. यावेळी दूध सोसायटी मुख्यप्रवर्तक सुनिल वाळके ,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन डॉ अनिल ठाकूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सदस्य तथा माजी सरपंच हरकुळ बुद्रुकचे आनंद ठाकूर, माजी उपसभापती बुलंद पटेल, माजी उपसरपंच राजू पेडणेकर, सोसायटी संचालक नित्यानंद चिंदरकर, लियाकत पटेल,बाबूल पटेल, सुनील वाळके, दूध उत्पादक शेतकरी चंदू सापळे, मनोहर कुंकेरकर ,तात्या वाळके ,वामन गोसावी गावातील दूध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या दुधाला बाजारामध्ये चांगला भाव मिळावा यासाठी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. हरकुळ बुद्रुक येथे ही द्वारका सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या माध्यमातून हरकुळ बुद्रुक व आजूबाजूच्या गावांमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध या डेअरी मध्ये संकलन करण्यात येणार आहे हे दूध कोल्हापूर येथील गोकुळ दूध डेअरीला पाठवण्यात येईल जेणेकरून सिंधुदुर्गातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल व भरभराट होईल. यासाठी या द्वारका सहकारी दूध व्यावसायिक संस्था सुरू करण्यात आली असल्याचे दूध सोसायटी मुख्यप्रवर्तक सुनिल वाळके यांनी सांगितले

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स