<em>त्रिंबक हायस्कूलच्या सायकल बँक मध्ये पंधरा सायकली……..!</em>
सुरेंद्र (अण्णा) सकपाळ यांच्या कार्यशीलतेचा विलास हडकर यांच्याकडून शब्दसुमनांनी गौरव.
चिंदर | विवेक परब : जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेमध्ये आज संदेश प्रताप बागवे व अभिषेक विकास बागवे यांच्या सौजन्याने प्राप्त झालेल्या पंधरा नविन मोफत सायकलींचे मान्यवरांच्या हस्ते वाटप कार्यक्रम सपन्न झाला. लाभार्थ्यांमध्ये पियुष आईर, पल्लवी घाडीगांवकर, भक्ती परब, सोनम घाडी, लीना परब, केतकी घाडीगांवकर, अर्पिता घाडीगांवकर, आदिती मेस्री, पुनम गांवकर, मानसी घाडीगांवकर, श्रावणी गावकर, मंदिरी मुणगेकर, वेंदागी चेंदवणकर, रिध्दी साटम, सानिका परब यांचा समावेश आहे.
काही महिन्यांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नांतून गोवा विमानतळ प्राधिकरण सी.एस.आर निधीतून, जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्हात एक हजार व त्रिंबक हायस्कूलमध्ये दहा सायकल्स, परिवर्तन केंद्र जिल्हा समन्वयक विलास हडकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी हडकर यांनी कार्यवाह सुरेंद्र सकपाळ यांच्याकडे त्रिंबक हायस्कूलची ‘सायकल बँक बनवा’ असा संकल्प करण्याचे आवाहन केले होते. सकपाळ यांनी संस्था अध्यक्षाच्या मदतीने हा संकल्प पूर्ण केला. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित विलास हडकर यांनी विचार मांडताना सुरेंद्र(अण्णा) सकपाळ यांच्या कार्याचा विशेष शब्द सुमनांनी गौरव केला.
यावेळी संस्था अध्यक्ष प्रताप बागवे, संचालक अशोक बागवे, श्रीकांत बागवे, एकनाथ गायकवाड , पोलिस पाटील बाबू सकपाळ, मुख्याध्यापक घाडीगांवकर, पवार सर, धुरे सर, वारंग सर, मेस्री सर, धकू त्रिंबककर, चंदु त्रिंबककर, मेहेंदळे पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)