ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवण प्रिमीअर लीगच्या चौथ्या वर्षीच्या हंगामाची घोषणा..!

मालवण प्रिमीअर लीगच्या चौथ्या वर्षीच्या हंगामाची घोषणा..!

प्रकाशन: 10 Feb 2022 09:38 PM
वाचन संख्या 231

मालवण स्पोर्टस् क्लब आयोजीत २०२२ सालची लेदरबाॅल स्पर्धा..!

२७ फेब्रुवारी ते ६ मार्च रंगणार सिंधुदुर्ग लेदरबाॅल क्रिकेटच्या पंढरीत मालवण प्रिमीअर लीग .

मालवण | (सुयोग पंडित) क्रीडावृत्त : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेदरबाॅल क्रिकेटची पंढरी असलेल्या मालवण शहरातील टोपिवाला हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राऊंड मैदानावर मालवण प्रिमीअर लीगच्या चौथ्या वर्षीच्या हंगामाची घोषणा झाली आहे.
मालवण स्पोर्ट्सतर्फे क्लब आयोजित या ‘मालवण प्रीमियर लीग २०२२’ लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ ते ६ मार्च २०२२ या कालावधीत खेळवली जाणार आहे.
स्पर्धेचे सर्व सामने टोपीवाला हायस्कूलच्या,खास लेदरबाॅलसाठी तैनात असलेल्या खेळपट्ट्यांवर खेळविले जातील.


या मालवण प्रिमीअर लीग स्पर्धेची संघनिवड प्रक्रिया ‘लिलाव पद्धतीने’ करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी खेळाडूंनी आपले प्रवेश अर्ज भरायचे आहेत.
प्रवेश अर्ज भरायची अंतिम मुदत दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ राहील.प्रवेश अर्ज ‘रवी मसाले,रामेश्वर कॉम्प्लेक्स ,भरड,मालवण येथे उपलब्ध आहेत. प्रवेश अर्जाची फी तथा शुल्क रुपये मात्र २०० राहील.


स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रु. ५५,५५५ असे असून द्वितीय पारितोषिक रोख रु. ३३,३३३ असे ठेवण्यात आले आहे.
संघ खरेदीसाठी तथा फ्रॅन्चायझी ओनरशिपसाठी इच्छुक असलेल्यांनी श्री.सौरभ ताम्हणकर +91 75885 64887, श्री. सुशील शेडगे यांच्याशी +91 74999 55147 संपर्क करावा असे आवाहन मालवण स्पोर्टस् क्लबतर्फे करण्यात आले आहे.

.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स