असलदे गावातील शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणार ; भगवान लोके यांची ग्वाही.
असलदेत नूतन चेअरमन भगवान लोके यांचा समाजसेवक शेखर सोनार यांच्या हस्ते सत्कार.
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : “आपण दिलेला आशीर्वादांमुळे मी जीवनात यशस्वी झालो आहे. तुम्ही दिलेले प्रेम मी कदापि विसरणार नाही.तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या पदापर्यंत पोहोचलो आहे.या सत्काराने माझी निश्चितच जबाबदारी वाढली आहे.असलदे सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार ” अशी विश्वासाची ग्वाही ‘असलदे वि का स सोसायटी’ चे चेअरमन आणि पत्रकार भगवान लोके यांनी दिली. असलदे उगवतीवाडी येथील ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्यावतीने, गणेश जयंती उत्सवानिमित्त असलदे विकास सोसायटी नूतन चेअरमनपदी भगवान लोके यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन समाजसेवक शेखर सोनार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी अध्यक्ष बबन हडकर,माजी सरपंच लक्ष्मण लोके,सुरेश लोके,गणेश लोके,पंकज आचरेकर,रामचंद्र जेठे,प्रदीप हरमलकर,राकेश आचरेकर,संदेश आचरेकर,दयानंद डगरे,सचिन लोके,नितीन आचरेकर, महेश लोके,दिवाकर डगरे, प्रकाश आचरेकर, विश्राम लोके, अनिल लोके, चंद्रकांत जेठे, राजू जेठे,दिनेश जंगले,विष्णू डगरे,विजय आचरेकर,विशाल जेठे,संजय जेठे, सचिन हरमलकर, मनोज लोके,जितेंद्र लोके,सुरेश जेठे,अनिल कोठारकर,प्रशांत लोके आदींसह गांवातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)