ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
४८ खेड्यांचा अधिपती श्री महालक्ष्मी स्थापेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात साजरा.

४८ खेड्यांचा अधिपती श्री महालक्ष्मी स्थापेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात साजरा.

प्रकाशन: 08 Feb 2022 05:48 PM
वाचन संख्या 112

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डेगवे येथील नवसाला पावणाऱ्या व हाकेला धावणाऱ्या,४८ खेड्यांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “श्री महालक्ष्मी स्थापेश्वरचा वार्षिक जत्रोत्सव सोमवारी धार्मिक व भक्तीमय वातावरणात उत्साहात सपन्न झाला. दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्य‍ा रांगा लागल्या होत्या.
सकाळी पासून धार्मिक कार्यक्रम,दुग्धाभिषेक,मानकरी,देवस्थान समितीचे पदाधिकारी,गावरहाटीचे विविध धार्मिक कार्यक्रम ,सकाळी ब्राह्मणांच्या हस्ते,गावगार्हाणे ,देवतांची पालखी मंदिरात आणण्यात आली. त्यानंतर नवस करणे,फेडणे,ओटी भरणे नारळ,केळी,साखर ठेवणे असे विविध कार्यक्रम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते.
त्यानंतर रात्री भजन, महाआरती,व मंदिरा भोवती पालखी काढण्यात आली.


या जत्रोत्सवाला मुंबई,पुणे,रत्नागिरी,बेळगांव,कर्नाटक,गोवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविकांनी उपस्थीत राहून देवतांचे दर्शन घेतले.
सर्व भाविक करोनाचे नियम पाळून व मास्क वापरून करत दर्शन घेताना दिसत होते. यंदा भाविक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
सर्व ग्रामस्थांनी व स्थानिक भाविकांनी जत्रोत्सवाला येणार्या सर्व भाविकांचे देवस्थान कमिटीच्या मार्गदर्शनाने योग्य नियोजन केले होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स