ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
रेवतळ्यात भारतीय जनता युवा मोर्चाचे ई श्रमकार्ड नोंदणी शिबीर उत्साहात..!

रेवतळ्यात भारतीय जनता युवा मोर्चाचे ई श्रमकार्ड नोंदणी शिबीर उत्साहात..!

प्रकाशन: 08 Feb 2022 02:16 PM
वाचन संख्या 157

भाजपाचे युवा शहर अध्यक्ष ललित चव्हाण आणि किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग यांचा संयुक्त पुढाकार.

मालवण | विनित मंडलिक : आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण शहरातील रेवतळे विभागात भारतीय जनता युवा मोर्चाच्या ई श्रमकार्ड नोंदणी शिबीराला उत्साहात सुरवात झाली.
रेवतळ्यातील फाटक शाळेमध्ये आयोजीत केल्या गेलेल्या या शिबिराचे आयोजन भाजपचे युवा शहर अध्यक्ष ललित चव्हाण आणि किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.


या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी मालवण शहराचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री सुदेश आचरेकर,नगरसेवक दिपक पाटकर,आबा हडकर,निनाद बादेकर पंकज गावडे,बाबू वायंगणकर,पंकज पेडणेकर,राजू बिडये,गणेश परब,तळाशिलकर,बाबू शिंदे आणि असंख्य भाजपा पदाधिकारी आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या नोंदणी शिबिराला कृष्णा साळसकर आणि गुरुनाथ माने यांनी विशेष तांत्रिक सहकार्य केले आहे.


नेहा खोत ,कृपा मयेकर आणि अक्षता गोसावी यांनी ऑनलाईन संगणक प्रणाली हाताळणी व नोंदणी याची जबाबदारी घेतली.
रेवतळ्यातील फाटक शाळेमध्ये आयोजीत या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष ललित चव्हाण आणि किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
सकाळी 10 ते सायंकाळी 05 असा या ई श्रमकार्ड नोंदणी शिबिराचा कालावधी आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स